गूळ खाण्याचे शरीराला अनेक फायदे असून साखरेपेक्षा गूळ आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितलं जातं.
उन्हाळा आणि थंडीच्या दिवसांमध्ये देखील गूळ खाणं फायद्याचं असतं.
याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
गुळामध्ये आयर्न फॅक्टर हा जास्त आहे आणि तो आपल्या शरीरासाठी लाभदायी आहे.
काळा आणि ब्राऊन रंगाच्या गुळामध्ये चिकटपणा जास्त आहे, असा गूळ खायला पाहिजे.
गूळ हा शरीरातील दाह आणि तापमान तात्काळ कमी करायला मदत करतो.
उन्हातून आल्यास एक गुळाचा खडा आणि पाणी पिले तर निश्चितच फायदा होतो.
जेवणानंतर जर तुम्ही एक गुळाचा खडा खाल्ला तर निश्चित तुम्हाला अन्न पचायला मदत होते.