रोज मनुके खाता? या पद्धतीने खाल तर होतील अनेक फायदे.. 

मनुकामध्ये प्रथिने, फायबर, लोह, पोटॅशियम, तांबे, व्हिटॅमिन बी 6 आणि मॅंगनीजसह अनेक आवश्यक पोषक असतात.

याच्या सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, ज्यामुळे आपल्याला अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.

मनुका मधून जास्त पोषक द्रव्ये हवी असतील तर ते भिजवून खावे.

रोज रात्री 20 ते 30 मनुके भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. 

भिजवल्यावर त्याची साल सैल होते.

ते खाल्ल्यानंतर मनुकामधील जीवनसत्त्वे आणि खनिजे थेट तुमच्या शरीरात पोहोचतात.

याशिवाय मनुका भिजवल्याने त्यांच्यातील अँटी-ऑक्सिडंटचे प्रमाणही वाढते.

मनुक्यामध्ये कॅल्शियम देखील चांगले असते, जे दात आणि हाडे मजबूत ठेवते.

मनुकामध्ये फायबर आणि अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या टाळते.

त्यामुळे नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाणही वाढते. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो.

मनुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अमीनो अ‍ॅसिड असते, जे तुमच्या शरीराला भरपूर ऊर्जा प्रदान करते.

याशिवाय तुम्ही ज्या पाण्यात मनुके भिजवले आहेत, ते पाणी प्यायल्याने अ‍ॅनिमियाची समस्याही दूर होईल.