हिवाळ्यात तिळगुळाचे लाडू खाण्याचे आरोग्यदायी फायदे
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने घराघरात तिळगुळाचे लाडू केले जातात.
परंतु हे लाडू केवळ सणासुदीसाठी मर्यादित नाहीत तर त्याचे आरोग्याला देखील अनेक फायदे आहेत.
तिळगुळाचे लाडू हे शेंगदाणे, तीळ आणि गूळ इत्यादींनी बनवले जातात आणि या तीनही पदार्थांचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
तीळ आणि गूळ या दोन्ही गोष्टींपासून शरीरात उष्णता निर्माण होते आणि शरीर उबदार राहते.
तिळामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी1, तांबे आणि जस्त आढळते जे आरोग्यासाठी गुणकारी आहेत.
गुळामध्ये इतर पौष्टिकतत्वांसह अँटिऑक्सिडंट्स आणि फिनोलिक अॅसिड असते ज्यामुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसची पातळी कमी होते.
तिळामध्ये फायटोस्टेरॉल आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असतात, जे शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात.
तिळाच्या बियांमध्ये सेसमिन आणि सेसमोलिन नावाची संयुगे आढळतात जी कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध करतात आणि तसेच हृदयविकाराचा धोका कमी होतो.
गुळाच्या सेवनाने पचनशक्ती मजबूत होते तसेच थकवा देखील दूर होतो.
तिळगुळाचे लाडू हे पौस्टिक असले तरी डायबेटिजच्या रुग्णांनी त्याचे सेवन प्रमाणातच करावे. तसेच इतर आजार असलेल्या रुग्णांनी देखील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हळदी कुंकवाला येणाऱ्या महिलांना काय वाण द्यायचं प्रश्न पडलाय? पाहा 6 युनिक पर्याय
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा