तुळशीच्या शेजारी नियमित दिवा लावण्याचे हे 9 फायदे 

तुळशीच्या रोपाजवळ लावलेला दीपक आदर आणि भक्तीचं प्रतीक आहे.

तुळशी शेजारी लावलेल्या दिव्याच्या प्रकाशामुळे परिसर शुद्ध आणि शांत राहतो.

तेल किंवा तुपाचा दिवा लावल्यानं निघणाऱ्या सुखद वासामुळे वातावरण सुधारते.

नियमित दिवा लावल्यानं त्याच्या धुरामुळे तुळशीचे रोप किटकांपासून वाचते.

दीप प्रज्वलित करणे हे भौतिक आणि आध्यात्मिक अंधकार दूर करण्याचे प्रतीक आहे.

तुळशीचे औषधी गुण आणि दीप प्रज्वलन यामुळे चांगल्या वातावरणाचा आरोग्यावर फायदेशीर परिणाम होतो.

तुळशीशेजारी प्रज्वलित दिवा शांतता वाढवतो आणि तणाव आणि चिंता कमी होते.

तुळशीची रोपे जोपासणे आणि त्याखाली दिवा लावल्यानं नैसर्गिक जगाशी अनोखा बंध वाढतो.

सांस्कृतिक मूल्ये जपत ते पुढील पिढीपर्यंत ज्ञानाचे हस्तांतरण करते, असे मानले जाते.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही