राइस ब्रान ऑयल : चांगल्या आरोग्यासाठी राइस ब्रान ऑयलचे सेवन केले जाऊ शकते. राइस ब्रान ऑयल अँटी ऑक्सीडेंटप्रमाणे काम करते आणि इंफ्लेमेशन दूर करते ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
राइस ब्रान ऑयल ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. वाईट कोलेस्ट्रॉलला कमी करण्यासाठी सुद्धा हे तेल उपयोगी ठरू शकते.
शेंगदाणे तेल : हृदयाच्या आरोग्यासाठी शेंगदाणे तेल फायदेशीर ठरते. या तेलात व्हिटॅमिन ई, माॅनोअनसॅचुरेटेड फॅटी ऍसिड आणि पॉलीअनसॅचुरेटेड फॅटी ऍसिड असतात.
मोहरीचे तेल :मोहरीच्या तेलात सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडची मात्र कमी असते परंतु फायदेशीर ठरणाऱ्या माॅनोअनसॅचुरेटेड फॅटी ऍसिड आणि पॉलीअनसॅचुरेटेड ऍसिडची मात्रा जास्त असते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)