डोहाळजेवणासाठी सुंदर सजली सई लोकूर!

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर लवकरच आई होणार आहे. 

सई सध्या प्रेग्नंसीचे दिवस एन्जॉय करतेय. 

आता लग्नाच्या तीन वर्षानंतर दोघांच्याही आयुष्यात सुंदर क्षण येणार आहेत. 

नुकतंच पारंपरिक पद्धतीने सईचं डोहाळजेवण पार पडलं. 

सई आणि तीर्थदीपने डोहाळजेवणाचा आनंद लुटला. 

सईने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत हे फोटो शेअर केले आहेत. 

सईच्या डोहाळजेवणाच्या खास लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं. 

आता आयुष्यातील नव्या टप्प्यासाठी सई आणि तीर्थदीप खूपच उत्सुक असल्याचं दिसत आहे.