बिग बॉसमध्ये येण्याआधी वडापाव गर्लची दिवसाची कमाई माहितीये?

बिग बॉस ओटीटी 3 सुरू झालं आहे. अनिल कपूर हा सीझन होस्ट करणार आहे.

बिग बॉस ओटीटी 3ची पहिली स्पर्धक चंद्रिका दीक्षित म्हणजेच दिल्लीची वडापाव गर्ल.

वडापाव गर्लमुळे मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली. आता ती बिग बॉसमध्ये हंगामा करण्यासाठी सज्ज झाली आहे.

दिल्लीच्या रस्त्यावर वडापाव विकणारी चंद्रिका दिवसाला हजारोंची कमाई करायची.

दिल्लीत मुंबईचा वडापाव विकणारी चंद्रिका वडापावच्या किंमतीमुळे सर्वात आधी निशाण्यावर आली.

मुंबईत 15-20 रुपयांना मिळणारा वडापाव ती दिल्लीत 50 रुपयांना विकायची.

एका दिवसात वडापाव विकून तिला 40 हजार रुपये मिळायचे. तिची महिन्याची कमाई तब्बल 12 लाख रुपये होती.

वडापाव गर्ल आता बिग बॉस ओटीटी 3मध्ये सहभागी झाली आहे.

वडापाव विकून चंद्रिकानं काही महिन्यांआधी 76 लाखांची शानदार फोर्ड मस्टँग कार खरेदी केली.