स्नेक बाईट म्हणजे काय? किती असते त्याची किंमत?
बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादववर पार्टीत स्नेक बाईट प्रोव्हाइड केल्याचा गंभीर आरोप आहे.
परंतु तुम्हाला माहित आहे का की स्नेक बाईट म्हणजे नक्की काय ते?
खरंतर तरुणाई याचा उपयोग नशा करण्याचे साधन म्हणून करते.
काही तरुण ड्रग्सचे सेवन करतात जे सापाच्या विषापासून तयार केले जाते.
एवढंच नाही तर अनेक प्रकरणांमध्ये समोर आले आहे की तरुण स्वतःच साप चावून घेतात.
अधिकतर लोक यासाठी कोब्राच्या विषाचा वापर करतात.
सापाच्या विषापासून बनवलेली पावडर पेय पदार्थांमध्ये मिक्स करून त्याचे सेवन केले जाते.
स्नेक बाईटच्या पावडरची किंमत ही 20 हजार ते 25 हजार पर्यंत असते.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सापाचे विष प्रतिलिटर लाखो रुपयांना विकले जाते.