रात्री या 2 अवयवांची करा मसाज, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
मसाज ही एक उपचार पद्धती आहे, जी बऱ्याच वर्षांपासून वापरली जात आहे.
शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर रात्री झोपण्यापूर्वी शरीराच्या या 2 भागांची मालिश करा.
मसाज थेरपीमध्ये तेलाने मालिश करतात आणि आजारांवर उपचार केले जातात. यामुळे हाडे मजबूत होतात, झोप चांगली लागते, चेहऱ्यावर चमक येते.
रात्री झोपण्यापूर्वी शरीराच्या या दोन भागांना मसाज का करावी? आणि कोणत्या तेलाने मालिश करावी? चला पाहूया.
आयुर्वेदात नाकाला मेंदूचे प्रवेशद्वार मानले जाते. नाकपुड्यांमध्ये लावण्यासाठी तुम्ही तिळाचे तेल किंवा तूप वापरू शकता. हे दोन्ही नाकपुड्यांमध्ये 1-1 थेंब तेल लावा आणि मालिश करा.
यामुळे मानसिक आरोग्यासाठी चांगले राहाते. डोकेदुखी दूर होते आणि तणाव कमी होतो. तसेच रात्री चांगली झोप लागते. तसेच यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
कानाजवळ तेल लावल्याने रक्तप्रवाह सुधारतो. ते एंडोर्फिन हार्मोन सोडते. त्यामुळे कानाला तेल लावणे मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले असते.
थोडं तिळाचं तेल किंवा शुद्ध तूप घेऊन बोटावर चोळा आणि त्यानंतर वर्तुळाकार गतीने मसाज कानामागे हळू हळू 5 मिनिटे कानामागे बोटाने मसाज करा.
जास्तीत जास्त फायद्यासाठी तेल निवडणे महत्वाचे आहे. प्रत्येक तेलाचे वेगवेगळे गुणधर्म असतात आणि ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात.
या अवयवांना एकदा मसाज करून पाहा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल.