या अभिनेत्यांनी स्त्री बनून जिंकलं प्रेक्षकांचं मन!

नुकतंच ड्रीम गर्ल बनून आयुष्यमान खुराणाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

आयुष्यमानच्या पूजा या रूपावर सगळेच भावले. 

आयुष्यमानच्या या भूमिकेचं सगळीकडेच कौतुक होत आहे. 

पण त्याच्याआधी सुद्धा अनेक अभिनेत्यांनी महिला रूपात सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

अभिनेता रितेश देशमुखने 'अपना सपना मनी मनी' या चित्रपटात महिलेची भूमिका साकारली आहे. 

गोविंदाने आंटी नंबर 1 या चित्रपटात साडी नेसत महिलेची भूमिका साकारली होती. 

कमल हासन यांनी चाची 420 या चित्रपटात वृद्ध महिलेची भूमिका साकारली होती. 

अक्षय कुमारने लक्ष्मी या चित्रपटात साडी नेसली होती. 

सैफ अली खानने हमशकल्स या चित्रपटात मुलीचं रूप घेतलं होतं.