‘इथं’ होलसेल दरात खरेदी करा पितळ्याच्या वस्तू

पूर्वीच्या काळी घरोघरी तांब्या-पितळेची भांडी वापरली जातात. सध्या त्याची जागा स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांनी घेतली.

तरीही तांब्या बिळेचे मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असणारे गुणधर्म आणि इतर कारणांनी पुन्हा तांब्या - पितळेची भांडी आणि इतर वस्तूंना महत्त्वा प्राप्त झाले आहे.

त्यामुळे मूर्ती, दागिने, सजावटीचं साहित्य, भांडी, पाणी साठवण्याचे पिंप यासाठी आवर्जून तांब्या - पितळेच्या वस्तूंची मागणी होत असते.

याच वस्तू आणि भांडी अगदी 100 रुपयांपासून पुण्यात मिळतात.

तुम्ही जुन्या वस्तूंच्या शोधात नियमित भटकणारे भटके असाल, तर जुना बाजार, रविवार पेठ, भवानी पेठ, मंडई, बुधवार पेठ इथं या वस्तू हमखास मिळतील.

तुळशी बागेतील दुकानांच्या रांगेत शुभलक्ष्मी मेटल्स नावाचं दुकान आहे. त्या ठिकाणी अगदी 100 रुपयांपासून पुढे मूर्ती आणि देवाची भांडी मिळतील.

यामध्ये प्रामुख्याने तांबा, पितळ यांची भातुकली, भांडी, पूजा सामान तसेच लाकडी ऑक्ससाईड देव्हारे देखील बनवून मिळतील, अशी माहिती दुकानदार मंदार बोथरे यांनी दिली आहे.

कॉटन कुर्ती फक्त 200 रुपयांत!