32,934 भरुन घरात आणा अलिशान थार!
महिंद्रा अँड महिंद्राची लोकप्रिय ऑफ रोड SUV थार रॉक्स गेल्या वर्षी भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाली होती. या 5-डोर थारच्या बेस मॉडेलची किंमत काय आहे ते जाणून घेऊयात.
महिंद्रा थार रॉक्सच्या बेस व्हेरियंटला MX1 असे नाव देण्यात आले आहे. MX1 पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनसह येते.
Mahindra Thar Rocks MX1 च्या पेट्रोल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत १२.९९ लाख रुपये आहे.
तर Mahindra Thar Rocks MX1 च्या डिझेल व्हेरियंटची किंमत १३.९९ लाख रुपये आहे.
डिझेल आणि पेट्रोल या दोन्ही प्रकारांमध्ये LED प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि LED टेललॅम्प्स असतील.
त्याचे पेट्रोल इंजिन १२.४० किमी/लिटर मायलेज देण्यास सक्षम आहे आणि डिझेल इंजिन १५.२ किमी/लिटर मायलेज देण्यास सक्षम आहे.
कारमध्ये 1997 सीसी इंजिन आहे जे जास्तीत जास्त 162hp पॉवर आणि 330Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
या कारमध्ये १०.२५ इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, पुश बटन स्टार्ट, रिअर एसी व्हेंट आणि ड्रायवर सीट अडजस्टमेंट फिचर आहे.
Mahindra Thar Rocks MX1 मध्ये ३-पॉइंट सीट बेल्ट, सीट बेल्ट रिमाइंडर, ड्युअल टोन एक्सटीरीअर आणि यूएसबी पोर्ट आहे.
महिंद्रा थार EMI 60 महिन्यांच्या कालावधीसाठी दरमहा रु. 32,934 पासून सुरू होते.