दही आणि ताक हे दोन्ही आरोग्यासाठी खूप चांगलं मानलं जातं.
मात्र वजन कमी करण्यासाठी दही आणि ताक यापैकी नेमकं काय खायला हवं याबाबत लोक कंफ्युज असतात.
वजन कमी करायचं असेल तर ताक हे दहापेक्षा जास्त फायदेशीर ठरतं.
100 ग्राम दहीमध्ये 98 कॅलरीज असतात.
तर 100 ग्राम ताकामध्ये 40 ग्राम कॅलरीज असतात.
ताक तुम्हाला हायड्रेट ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. कारण यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं.
ताकाचे सेवन केल्याने शरीर जास्त काळ भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे तुम्ही जास्त खात नाही.
काही लोकांना दह्यापासून लैक्टोज इनटॉलरेंस होते. अशा लोकांना दही खाणे जमत नाही, पण ताक पचायला जास्त मेहनत लागत नसल्याने त्यांना ताक पिण्याचा पर्याय असतो.
पोषकतत्वांबद्दल बोलायचं झाल्यास दही आणि ताक या दोघांमध्ये भरपूर प्रोबायोटिक्स असतात.
दही आणि ताकात कॅल्शियम, विटामिन आणि अन्य पोषकतत्व असतात.