ही युक्ती  वापरा, उन्हाळ्यात वीज बिल होईल निम्मे..!

उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे साहजिकच पंखे, कुलर आणि एसीचा वापर वाढला आहे.

महागाईच्या काळात वाढीव वीज बिल ही लोकांसाठी मोठी समस्या बनते.

आज आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमचे वीज बिल अर्ध्याहून अधिक कमी करू शकता.

LED चा वापर : विजेची बचत करण्यासाठी बल्ब आणि ट्यूबलाइटऐवजी एलईडी वापरा.

अनप्लग करा : वापरात नसताना चार्जर, टीव्ही, संगणक आणि इतर उपकरणे अनप्लग करा. 

एसी तापमान : एसीचे तापमान 24 ते 25 अंश असावे याकडेही लक्ष द्यावे. असे केल्याने तुमचे वीज बिल कमी होऊ शकते. 

कमी वीज : तुमचा पंखा कमी उर्जा वापरणाऱ्या पंख्याने बदला. कमी वीज वापरणारी उपकरणे वापरा. 

नैसर्गिक प्रकाश : दिवसा फक्त नैसर्गिक प्रकाश वापरा, बल्ब आणि इतर लाईट बंद ठेवा. 

या पद्धतींचा अवलंब केल्यास तुमचे वीज बिल नक्कीच कमी होऊ शकते.