अजूनही पाकिस्तान करु शकतं सेमी-फायनलमध्ये एन्ट्री

सोमवारी अफगाणिस्ताकडून पराभव झाल्यानंतर वर्ल्ड कप 2023 मधील पाकिस्तानचा सलग तिसरा पराभव ठरला

मात्र तरीही पाकिस्तान क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी-फायनलमधून बाहेर पडलेला नाही

तसे पाहाता क्रिकेट वर्ल्ड कपमधील सर्व संघ सेमी फायनलच्या शर्यतीत अजूनही जिवंत आहेत

सेमी फायनलसाठी पात्र होण्यासाठी, 5व्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानला (4 गुण) म्हणजेच त्यांचे उर्वरित सामने जिंकणे आवश्यक आहे

त्यांचा पुढील सामना दक्षिण आफ्रिका (ऑक्टो. 27), बांगलादेश (31 ऑक्टोबर), न्यूझीलंड (4 नोव्हेंबर) आणि इंग्लंड (11 नोव्हेंबर) विरुद्ध होईल.

जर पाकिस्तानने पुढचे 4 सामने जिंकले आणि उत्कृष्ट NRR सह 12 गुण मिळवले तर त्यांना सेमी फायनल गाठता येईल.

त्यासाठी पाकिस्तानला ऑस्ट्रेलियासह इतर संघांकडून मदतीची गरज आहे.

4 सामन्यांतून केवळ 2 सामने जिंकले तर पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर पडेल

सेमी फायनलसाठी IND, NZ, SA आणि AUS विरुद्ध स्पर्धा करण्यासाठी त्यांना फक्त जिंकण्याची गरज नाही तर चांगल्या NRR ची देखील गरज आहे