चहा पिणाऱ्यांची जगभरात कमी नाही. लोक अगदी पावसाळा-थंडीतही चहा पितात, शिवाय कडक उन्हात ही चहा पितात.
याच चहाबद्दल एक विषेश माहिती समोर आली आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
चहा हा शब्द मराठी नाही, तसेच चहाचा शोध हा भारतात लागलेला नाही.
इंग्रज चहाला भारतात घेऊन आले. ज्यानंतर हे भारतीयांचं आवडतं पेयं झालं.
आपण ज्याला मराठीत चहा किंवा हिंदीमध्ये चाय म्हणतो. हे दोन्ही शब्द चीनमधून आले आहेत.
हा मूलतः चीनमध्ये बोलल्या जाणाऱ्या मंदारिन भाषेतील शब्द आहे. याला चीनमध्ये "Cha (茶)" म्हणतात.
कोरिया आणि जपानमध्येही असेच म्हटले गेले आणि जिथे जिथे हा शब्द पोहोचला तिथे त्याला चहा म्हटले गेले.
चहाला पारशीमध्ये "Chaye" म्हणतात, ज्याला उर्दूमध्ये चाय म्हणतात. अरबी भाषेत त्याला 'Shay' म्हणतात, रशियन भाषेत 'Chay' म्हणतात, स्वाहिली भाषेत 'Chai' म्हणतात
चहा प्रमाणेच Tea या शब्दाला ही वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखलं किंवा बोललं जातं.
आश्चर्य म्हणजे 'टी' हा इंग्रजी शब्दही चीनमधून आला आहे. जिथे '茶' चा उच्चार 'te' होतो.