आई-वडिलांच्या या चुकांमुळे मुलं बिघडतात

आई-वडिलांच्या या चुकांमुळे मुलं बिघडतात

सध्याच्या काळात मुलांचं संगोपन हा प्रत्येक पालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.

मुलांचं संगोपन व्यवस्थित व्हावं, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे, त्यांनी उत्तम शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी व्हावं, असं पालकांना वाटतं.

 परंतु, काहीवेळा कौटुंबिक वादविवाद, पालकांमधला परस्पर विसंवाद आदी गोष्टींचा घरातील मुलांवर नकळत परिणाम होतो.

घरातील मोठ्या व्यक्तींनी लहान मुलांसमोर काही गोष्टी करताना सावधगिरी बाळगावी, असं आचार्य चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, घरातल्या मोठ्या व्यक्तींनी लहान मुलांसमोर कधीही अपशब्द वापरू नयेत.

लहान मुलं समोर असताना जाणीवपूर्वक भाषा चांगली असावी. कारण लहान मुलं मोठ्या व्यक्तींचं अनुकरण करत असतात.

घरातील लहान मुलांसमोर कधीही खोटं बोलू नये, असं आचार्य चाणक्य सांगतात. यामुळे मुलांच्या नजरेतून तुमचा आदर कमी होतो.

आई-वडिलांनी मुलांसमोर एकमेकांच्या त्रुटी काढू नयेत किंवा त्यावर भाष्य करू नये. असं केल्यानं मुलांच्या नजरेतून तुमचा आदर कमी होतो आणि मुलंदेखील त्याप्रमाणे वागतात.

आई-वडिलांनी मुलांसमोर एकमेकांचा आदर, सन्मान करावा. एकमेकांचा अपमान होईल, असं बोलू नये.

या गोष्टी केल्याने मुलंदेखील तुमचा आदर करतील, सन्मान ठेवतील. किंबहुना अशा संस्कारांमुळे मुलांना इतर व्यक्तींचा आदर ठेवण्याची शिकवण मिळेल.