अशा महिलांचा अवमान म्हणजे साक्षात लक्ष्मीचा अपमान

अशा महिलांचा अवमान म्हणजे साक्षात लक्ष्मीचा अपमान

आई - आई या शब्दातच सर्व काही येतं. आईची सेवा करून तिचा मान-सन्मान राखला गेला पाहिजे.

आईची काळजी घेऊन तिला आनंदी ठेवणाऱ्याचे कधीही नुकसान होत नाही.

गुरूची पत्नी - गुरू किंवा आपल्या शिक्षकांच्या पत्नीचा आपल्याकडून योग्य तो आदर सन्मान व्हायला हवा.

आपल्या गुरू इतकाच मान-सन्मान गुरूच्या पत्नीलाही द्यायला हवा

पत्नीची आई - पत्नीच्या आईचे स्थान आपल्या आईप्रमाणेच मानायला हवे.

सासूबाईंचा मान-सन्मान राखल्यानं माता लक्ष्मीची कृपा राहते.

राजाची पत्नी - चाणक्यंच्या मते, राजाची पत्नी आपल्या मातेसमान असते. कारण राजा प्रजेला मुलांप्रमाणे सांभाळत असतो.

 मित्राची बायको - मित्राच्या बायकोविषयी आपल्या मनात शुद्ध भावना असायला हवी.

त्यामुळेच दोन मित्रांमध्ये विश्वास, इमानदारी ठिकून राहू शकते, अन्यथा संबंध तुटतात.