चाणक्य नीतीमधील सुखी आयुष्य जगण्याचे 10 कानमंत्र
एखाद्या व्यक्तीने खूप प्रामाणिक नसावे, कारण सरळ झाडे आधी कापली जातात.
इतरांच्या चुकांमधून शिका, स्वतः चुकांमधून शिकण्या इतपत मोठं आयुष्य सर्वांना मिळत नाही.
शिक्षण हा सर्वात चांगला मित्र आहे. सुशिक्षित व्यक्तीचा सर्वत्र आदर केला जातो.
तुमची गुपिते कोणाशीही शेअर करू नका, ते तुमचा नाश करेल.
साप जरी विषारी नसला तरी त्याने विषारी असल्याचे भासवले पाहिजे.
जेव्हा भीती तुमच्या जवळ येते तेव्हा हल्ला करून त्याचा नाश करा.
फुलांचा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेने पसरतो, परंतु माणसाचा चांगुलपणा सर्व दिशांना पसरतो.
माणूस त्याच्या कृतीने महान बनतो, जन्माचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो.
प्रत्येक मैत्रीमागे काही ना काही स्वार्थ असतो. स्वार्थाशिवाय मैत्री नाही.
तुमच्या स्टेटसच्या वर किंवा खाली असलेले मित्र कधीही बनवू नका. अशी मैत्री कधीच आनंद देत नाही.