chanakya niti: असे मित्र नसावेत, एक दिवस 'खड्ड्यात' घालतात

आचार्य चाणक्य यांच्या नीति  कठीण काळामध्ये व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात.

आचार्य चाणक्य हे एक महान मुत्सद्दी, अर्थशास्त्रज्ञ आणि नीतिशास्त्रज्ञ होते. आचार्य चाणक्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

चाणक्य नीति सांगते की,आयुष्यामध्ये चांगला मित्र मिळणं अत्यंत आवश्यक आहे.

ज्यांना चांगले मित्र असतात त्यांची प्रगती नेहमीच होत राहते.

चुकीचे आणि फसवे मित्र मिळतात. त्या वेळेस मात्र आयुष्यात संकटं यायला लागतात. म्हणून मित्र बनवताना सावध रहावं.

आचार्य सांगतात सुख-दुःखामध्ये साथ देतात तेच खरे मित्र असतात. संकटाच्या काळामध्ये खऱ्या मित्रांची ओळख होते

चुकीच्या गोष्टी करत असताना चांगला मित्र आपल्याला अडवतो. चाणक्यनीती नुसार मित्र जेव्हा चुकीच्या गोष्टी करतो त्यावेळेस स्वार्थी मित्र प्रोत्साहन देतात.

खरे मित्र नेहमीच आपली मैत्री मजबूत करण्याचा प्रयत्न करतात. खरेपणा आणि इमानदारीने आपली मैत्री टिकवतात.

स्वार्थी आणि लालची मित्र फक्त फायद्यासाठी आपला वापर करतात आणि त्यामुळेच मैत्री तुटते.