रात्रीचे जेवण हे आपल्या चांगल्या झोपेसाठी, पचनासाठी, ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप महत्वाचे असते.
तेव्हा शरीराला ऊर्जा देण्यासाठी रात्रीच्या जेवणात चपाती खावी की भात हे जाणून घ्या.
चपाती आणि भात या दोन्ही पदार्थामधून मिळणाऱ्या पोषक तत्वांमध्ये काही खूप जास्त अंतर नसते.
भातात सोडियमचे प्रमाण अतिशय नगण्य असते तेथे 120 ग्रॅम गहूमध्ये 190 मिलिग्रॅम सोडियम असते.
भातात जास्त कॅलरीज असतात परंतु त्यातून शरीराला मिळणाऱ्या पोषणाचे प्रमाण कमी असते.
60 ग्रॅम भातात 80 कॅलरीज असतात तर 1 ग्रॅम प्रोटीन आणि 0.1 ग्रॅम फॅट्स, 18 ग्रॅम कार्ब्स असतात.
भातात चपातीच्या तुलनेत फॉस्फरस आणि मॅग्नेशियम कमी प्रमाणात असते. भातात आणि चपातीत समान प्रमाणात फॉलेट आणि आयरन असते.
आहारतज्ञांच्या मते आरोग्यासाठी चपाती आणि भात हे दोन्ही फायदेशीर ठरते. भातासोबत डाळ खाल्ल्याने शरीराला प्रोटीन मिळते. प्रोटीनमध्ये शरीरासाठी आवश्यक आवश्यक असलेले एमिनो ऍसिड्स मिळतात.
तर बाजरी, ज्वारीचे पीठ गव्हात मिक्स करून त्याच्या चपात्या खाल्ल्याने त्या शरीरासाठी अधिक पौष्टिक असतात. यामधून शरीराला झिंक, फॉस्फरस आणि कॅल्शियम मिळते.
चपाती आणि भात या दोन्ही पदार्थांना वेगवेगळ्या दिवशी रात्रीच्या जेवणात खाल्ले जाऊ शकते. पण तुम्ही जेवणात किती भात किंवा चपात्या खाता आहात हे लक्षात ठेवा.
रात्रीच्या जेवणात जर तुम्हाला भात खायचा असेल तर तुम्ही केवळ अर्धी वाटी भात खावा. जर चपाती खात असाल तर केवळ दोन ते चार चपात्या खा.