घरगुती वापरातील वस्तूंची ‘इथं’ करा स्वस्तात खरेदी
रोजच्या वापरात आपल्या प्लास्टिकच्या वेगवगेळ्या वस्तू लागतात.
कोल्हापुरात ह्या वस्तू विकत घेण्यासाठी बाजारगेट परिसर हा चांगला ऑप्शन आहे.
या बाजारपेठेत प्लास्टिकच्या अगदी छोट्यातल्या छोट्या वस्तूपासून मोठ्या वस्तू देखील सहज मिळतात.
अमीर पटवेगार यांचे या बाजारगेट गल्लीत गेल्या जवळपास 30 वर्षांपासूनचे अमीर कटलरी हे दुकान आहे.
या दुकानातही अनेक प्लॅस्टिकच्या वस्तू मिळतात.
लहान मुलांची खेळणी, स्वयंपाकघरातील विविध वस्तू, गृह सजावटीच्या वस्तू, बागकामाशी संबंधित वस्तूंचा समावेश आहे.
प्लॅस्टिकच्या वस्तूचे हे होलसेल मार्केट असल्यानं इथं अनेक वस्तूंच्या किंमती बाजारभावापेक्षा कमी आहेत.
गुजरातनंतर मुंबईतील या भागात होलसेल दरात अस्सल बांधणी; नवरात्रीची आताच करून ठेवा सोय!
Learn more