तैवान पेरूने शेतकरी लखपती!

भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाची निम्मी लोकसंख्या ही शेती करते.

शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात.

सध्याला शेतकरी हे पारंपारिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीकडे जास्त वळलेले आहेत.

छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी राजेंद्र आणि श्रीकांत हाके यांनी पारंपरिक मोसंबी शेतीला फाटा दिला.

आता तैवान पेरूच्या शेतीतून ते लाखोंचा नफा मिळवत आहेत.

छत्रपती संभाजी नगर शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर आडगाव बुद्रुक हे छोटसं गाव आहे. या गावातील 90 टक्के लोक शेतीच करतात.

मात्र, पारंपरिक शेतीला फाटा देत काही शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरलीय. काही शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करतात.

राजेंद्र हाके आणि श्रीकांत हाके यांनी आपल्या दीड एकर शेतामध्ये पेरूची लागवड केली. पेरूची शेती करण्यासाठी जास्त पाण्याची गरज पडत नाही.

त्याचबरोबर जास्त मशागतीची देखील गरज पडत नाही. त्यामुळे ही शेती करणं अत्यंत सोपा आहे, असं हे शेतकरी सांगतात.

यावर्षी राजेंद्र हाके यांना तीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळालं आहे. त्यांच्या पेरूच्या बागेतून आतापर्यंत 400 कॅरेट पेरू निघालेले आहेत.

एका गुंठ्यात उसाचं विक्रमी 3 टन उत्पन्न