फक्त 25 रुपयांपासून खरेदी करा पितळी वस्तू

पूर्वी रोजच्या वापरात असणारी तांब्या पितळेची भांडी आता दुर्मिळ झाली आहेत. 

आरोग्यासाठी उत्तम मानल्या जाणाऱ्या या भांड्यांकडे पुन्हा लोकांचा कल वाढतोय. 

अनेकजण पितळेची भांडी आणि आरती, समई, मूर्तीं, शोच्या वस्तू आवर्जून घेतात. 

या वस्तू खरेदी करायच्या असतील तर छत्रपती संभाजीनगरमध्ये या वस्तूंचं खास मार्केट आहे.

या ठिकाणी नैवेद्यासाठी किंवा देवासाठी लागणाऱ्या वस्तू, पूजेचे ताट आणि भांडी उपलब्ध आहेत. 

भांडी बाजारात मूर्ती, दिवे, समई, शोच्या वस्तू यांमध्ये अनेक व्हरायटी पाहायला मिळतात. 

येथील बाजारात एक दिवा 25 रुपयांपासून ते 25 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. 

या बाजारात पितळेच्या वस्तू नगावर किंवा वजनावर देखील विकत घेता येतात.