शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास

शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली असून आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय. 

असं असताना देखील काही भागांमध्ये मूलभूत सुविधांची स्थिती फार बिकट आहे. 

छत्रपती संभाजीनगरमधीाल गंगापूर तालुक्यातील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शाळेला जातायेत.

भिवधानोराच्या विद्यार्थी सडक्या थर्माकोलवर बसून नदीतून वाट काढत शाळा जवळ करतात. 

गावाला लागून जायकवाडी धरणाचे बॅकवॉटर असून विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी रस्ता नाही.

सडक्या थर्माकोलवर बसून हे विद्यार्थी रोज एक किलोमीटर अंतरावरील शाळेत जातात.

गावातील पहिली ते बारावीचे 15 विद्यार्थी रोज पाण्यातून जीवघेणा प्रवास करतात. 

मुलांच्या थर्माकोलवर पाण्यात असलेले विषारी साप चढू नये यासाठी मुलं काठी घेऊन बसतात. 

नदीपात्रातून बाहेर पडल्यावर मुलांना गवतातून वाट काढत शाळेपर्यंत जावं लागतं. 

गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांतून संताप व्यक्त होतोय.