न्यायाधीशांनी पार्किंगमध्येच घेतली सुनावणी
न्यायाधीशांनी पार्किंगमध्येच घेतली सुनावणी
भारतीय न्यायव्यवस्थेतील न्यायासाठी होणाऱ्या दिरंगाईबाबत अनेकजण बोलत असतात.
सध्या छत्रपती संभाजीनगरमधील एका न्यायदानाच्या घटनेची राज्यभर चर्चा होतेय.
न्या. ए. आर. उबाळे यांनी दिव्यांग व्यक्तीसाठी थेट पार्किंगमध्येच सुनावणी घेतलीय.
जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमध्ये राष्ट्रीय लोक अदालत भरवण्यात आली होती.
एका मोटार अपघाताली जखमी व्यक्तीच्या नुकसान भरपाईचं प्रकरण होतं.
मोटार अपघातात गोरखनाथ पांडुरंग घुगे यांना 42 टक्के कायमस्वरुपी अपंगत्व आलं होतं.
न्यायालयात सुनावणीसाठी येणं शक्य नसल्याने ते पार्किंगमध्येच कारमध्ये थांबले होते.
तेव्हा न्या. ए. आर. उबाळे यांनी स्वत: पार्किंगमध्ये येऊन सुनावणी घेतली आणि प्रकरण निकाली काढले.
छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा न्यायाधीशांनी घेतलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होतंय.
बौद्ध विवाहात मुहूर्त पाहतात का?
Learn more