स्वस्तात मस्त करा ‘या’ ठिकाणी भांडी खरेदी!

भांड्याचा वापर अन्न शिजवण्यासाठी आणि पदार्थ साठवण्यासाठी केला जातो. त्यामुळे वेगळ्याप्रकारच्या भांड्यांची खरेदी केली जाते.

अशावेळी स्वस्तात भांडी कुठे मिळतील याचा शोध सुरु होतो.

तुम्हाला जर स्वस्त दरामध्ये भांडी खरेदी करायचे असतील तर आम्ही तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमधील एका मार्केटबद्दल माहिती सांगणार आहोत.

छत्रपती संभाजीनगर शहरातील भांडी बाजार पानदरिबा या भागामध्ये भांड्यांचे होलसेल मार्केट आहे.

या मार्केटमध्ये तुम्ही 250 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यत भांड्यांची खरेदी करू शकता.

या मार्केटमध्ये चमचा, वाटी, ग्लास, ताट, कढई, पातीले, तांबे, लोटा, ट्रे अशा प्रकारचे वेगवेगळे भांडी उपलब्ध आहेत.

यासोबतच स्टीलचे, जर्मन, तांब, पितळाचे, ॲल्युमिनियम या सर्व धातूंचे भांडी सुद्धा उपलब्ध आहेत.

फक्त 25 रुपयांपासून खरेदी करा पितळी वस्तू