छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे.
त्यामुळे राजस्थान इथून जालना येथे आलेले कलाकार छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर अखेरचा हात मारण्याचे काम करत आहेत.
या कलाकारांकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती बरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
मागील तीन महिन्यांपासून राजस्थानातील राठोड कुटुंब जालना शहरात येऊन राहते आहे.
शहरातील खरपुडी रोडवर त्यांनी आपलं बस्तान बसवलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या मूर्ती हे कलाकार घडवतात.
केवळ 100 रुपयांपासून ते तब्बल 10 हजार रुपयांपर्यंतची मूर्ती या कारागिरांकडे उपलब्ध आहेत.