तुम्ही कधी खाल्लाय का चिकन वडापाव?
मुंबईचे आणि वडापावचे एक वेगळेच नाते आहे.
मुंबईचा कोणत्याही नाक्यावर आपल्याला एक तरी वडापावचा गाडा दिसतोच.
खूप वर्षांपासून चालत असलेला हा वडापाव खाऊन तुम्ही जर आता बोर झाला असाल तर मार्केटमध्ये आता चिकन वडापाव मिळत आहे.
हा वडापाव ठाण्यात मिळत असून हा चिकन वडापाव खाण्यासाठी नॉनव्हेज प्रेमी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
ठाण्याच्या स्टेशन जवळील परिसरात असलेले श्री मराठा फुड ऑफ वर्ल्ड या दुकानात चिकन वडापाव खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होत आहे.
या ठिकाणी व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारचे वडापाव मिळतात.
या चिकन वडापावमध्ये बोनलेस चिकनचे बॅटर बनवून तो वडा तेलात तळला जातो.
त्यावर बटरने पाव गरम करून त्या पावात तो वडा स्पेशल चटणी लावून गरम करण्यात येतो.
गरमागरम चिकन वडापाव प्लेटवर घेऊन त्याला भरपूर चीज आणि केचप सोबत सर्व्ह केले जाते.
या चिकन वडापावची किंमत 50 रुपये अशी आहे.