ख्रिसमस सण जवळ आला आहे. त्यामुळे सगळीकडेच बाजारपेठांमध्ये सध्या नाताळच्या खरेदीसाठी गर्दी दिसत आहे.
ख्रिसमस ट्री, सांता क्लॉज, सजावटीचं सामान आणि गोडधोड पदार्थ खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग आहे.
नाताळासाठी पुण्यातल्या बाजारपेठा देखील सजलेल्या पाहायला मिळत आहेत.
पुण्यातील बाजारपेठामध्ये वेगवगेळ्या प्रकारच्या वस्तू स्वस्तात खरेदी करता येतील.
सध्या पुण्यातील शुक्रवार पेठ बाजारपेठेत ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, मॅजिक बॉल, गोल्डन सिल्व्हर स्टार सांता कॅप, मास्क मिळत आहेत.
तरुणांसाठी सांता ड्रेस, लहान मुलांचे ड्रेस, अशा विविध वस्तू बाजारात उपलब्ध आहेत.
हॅपी ख्रिसमस, मेरी ख्रिसमस, जिंगल जिंगल बेल्स म्हणणारा सांताही दुकानांमध्ये दिसत आहे.
40 रुपयांपासून ते दीड हजारापर्यंत या ठिकाणी ख्रिसमसाठी उत्तम प्रकारच्या सजावटीसाठी वस्तू खरेदी करता येतील.