5 रुपयात
चमकवा
घाणेरडे किचन सिंक !
सणासुदीचा काळ आला असल्याने घराच्या प्रत्येक भागाची स्वच्छता करणे अत्यावश्यक बनले आहे.
तुम्ही काळे पडलेले किचन सिंक साफ करायला विसरलात का?
काळजी करू नका. तुम्ही फक्त 5 रुपयांत घाण झालेले किचन सिंक साफ करू शकता. कसे ते पाहूया.
सिंक ओले करा आणि बेकिंग सोडा शिंपडा. 15 मिनिटे राहू द्या. आता लिक्विड सोप आणि स्क्रबरने स्वच्छ करा.
सिंकचे डाग काढून टाकण्यासाठी प्रथम सिंकमध्ये बेकिंग सोडा शिंपडा. त्यानंतर त्यावर व्हिनेगर शिंपडा. 10 मिनिटांनी स्क्रबरने स्वच्छ करा.
लिंबू सर्व डाग सहज काढू शकते. यासाठी सिंकमध्ये मीठ टाकून लिंबू चोळा. याने तुमचे सिंक चमकेल.
त्यासाठी कोमट पाण्याने सिंक घासून घ्या. यामुळे जुने डाग सहज निघून जातात.
सिंकमध्ये टूथपेस्टचा थर लावा. 10 मिनिटे राहू द्या. त्यानंतर स्क्रबर आणि पाण्याने स्क्रब करा.
डिटर्जंट आणि कोमट पाण्याने घट्ट पेस्ट बनवा. त्यानंतर ते सिंकमध्ये टाका आणि ब्रशने घासून घ्या.
लिक्विड साबण तुमच्या सिंकला नवीनसारखे चमकवेल. तुमच्या सिंकमध्ये द्रव साबण घाला आणि ब्रशने स्क्रब करा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ करा.
अशापद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचे घाणेरडे आणि पिवळे सिंक फक्त 5 रुपयात सहज साफ करू शकता.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक