'हा' साप 9 फूट लांबूनही करु शकतो आंधळं

स्पिटिंग कोब्रा नावाचा एक साप आहे, जो दुरून विष थुंकतो, त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होतो

झेब्रा स्पिटिंग कोब्रा त्याच्या स्टाँग विषामुळे ओळखला जातो.

हा साप आपल्या शिकारीच्या डोळ्यात पाहतो आणि 9 फूट अंतरावरून विष थुंकतो.

हे नामिबिया, अंगोला आणि दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात आढळतात

सापाच्या डोक्याच्या बाजूला असलेल्या पिशव्यामध्ये त्याचं विष साठवले जाते.

जेव्हा त्याला धोका जाणवतो तेव्हा तो त्वरीत विष थुंकून स्वतःचे संरक्षण करतो

हा साप माणूस बसलेला, उभा असताना आणि झोपतानाही विष थुंकू शकतो.

या सापाचे डोके काळे किंवा तपकिरी असून पोटावर पट्टे असतात.

लाजाळू स्वभाव असल्यामुळे हा झेब्रा स्पिटिंग कोब्रा लपलेला राहतो