दिवाळीचं वेळापत्रक: कोणत्या दिवशी काय आणि शुभ मुहूर्त

गुरुवार 9 नोव्हेंबर रोजी रमा एकादशी, गोवत्स द्वादशी, वसुबारस आहे. यादिवशी गाय आणि वासरू यांचे पूजन करावयाचे असते.

शुक्रवार 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती आहे. या दिवशी दीपदान करावयाचे आहे. 

या दिवशी सकाळी 6-44 ते 8-09 चल, सकाळी 8-10 ते 9-34 लाभ, सकाळी 9-35 ते 10-59 अमृत, दुपारी 12-24 ते 1-49 शुभ आणि सायं. 4-39 ते 6-01 चल चौघडी यावेळेत चोपड्या आणाव्यात.

शनिवार 11 नोव्हेंबर रोजी कोणताही सण नाही.

रविवार 12 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी कुबेर पूजन आहे. या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करावयाचे आहे.

तसेच याच दिवशी प्रदोषकाळी म्हणजे सायं. 6 ते रात्री 8-33 यावेळेत लक्ष्मी-कुबेर पूजन करावयाचे आहे.

सोमवार 13 नोव्हेंबर या दिवशी दिवाळीतील कोणताही सण नाही.  

मंगळवार 14 नोव्हेंबर या दिवशी बलिप्रतिपदा आहे.विक्रम संवत् 2080 राक्षसनाम संवत्सराचा तसेच महावीर जैन संवत् 2550 चा प्रारंभ होत आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तातील शुभ दिवस आहे.

या दिवशी गोवर्धन पूजन आणि अन्नकूट आहे. याच दिवशी व्यापारी लोक नवीन चोपड्यांवर लेखनास प्रारंभ करतात.

त्यासाठी सकाळी 9-34 ते10-58 चल, 10-59 ते12-22 लाभ, दुपारी 12-23 ते 1-46 अमृत आणि दुपारी 3-10 ते 4-34 शुभ चौघडीत वही लेखन करावे.

बुधवार 15 नोव्हेंबर रोजी यमद्वितीया, भाऊबीज आहे.

पुढीलवर्षी दीपावलीचा सण 12 दिवस अगोदर येणार आहे. पुढीलवर्षी शनिवार 2 नोव्हेंबर 2024 रोजी बलिप्रतिपदा येणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यानी सांगितले.