तुमचं हृदय जपण्यासाठी करा हे काम

तुमचं हृदय जपण्यासाठी करा हे काम

निरोगी पेशी तयार करण्यासाठी आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल आवश्यक असते. 

शरीरातील कोलेस्ट्रॉलचे वाढलेले प्रमाण मात्र मोठ्या धोक्याचे लक्षण ठरू शकते. 

जर शरीरात खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले तर ते रक्तातील रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते. 

हृदय आणि मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा आल्यास हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो.

आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी नागपुरातील डॉ. श्रुती आखरे यांनी माहिती दिलीय. 

छातीत डाव्या बाजूला दुखणे, थकवा, चक्कर येणे, हातापायाला मुंग्या येणे ही लक्षणे असू शकतात. 

धकाधकीचे जीवन, जीवनशैली, अपुरी झोप, अपुरा सकस आहार ही कोलेस्टेरॉल वाढीची लक्षणे आहेत. 

दैनंदिन आहारात फायबर, प्रोटीन्स युक्त हिरव्या पालेभाज्या आदी सकस आहाराचा समावेश करावा. 

पाणी पिणे, जेवण आणि झोपण्याच्या वेळा पाळाव्यात. तसेच रोज योगा, व्यायाम करावा. 

योग्य उपचार घेतल्यास कोलेस्टेरॉल नियंत्रणातही आणता येते, असे डॉ आखरे सांगतात.