कॉटन कँडी ठरू शकते गोड विष! तुम्ही मुलांना देत नाही ना?
वेगवेगळ्या रंगांमुळे आणि गोड चवीमुळे मुलांना कॉटन कँडी आवडते.
वेगवेगळ्या रंगात बनवण्यासाठी विषारी रसायनांचा वापर केला जात असल्याने ते आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे म्हटले जाते.
रोडामाइन-बी हे विषारी रसायन असून त्याचा वापर कपड्यांना रंग देण्यासाठी केला जातो, असे कर्करोग तज्ज्ञ सांगतात.
रोडामाइन बी हे रसायन कार्सिनोजेन श्रेणीत ठेवले जाते. याचा अर्थ असा की अन्नामध्ये रोडामाइन रसायनाचा सतत वापर केल्याने कर्करोग होऊ शकतो.
या रसायनामुळे कॅन्सरचा धोका तर वाढतोच, पण त्याचा दीर्घकाळ वापर केल्यास किडनी आणि लिव्हरलाही नुकसान होऊ शकते.
या रसायनामुळे वाढत्या मुलांच्या उंचीवर परिणाम होतो. त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.
कॉटन कँडीमध्ये रोडामाइन-बी आढळल्यानंतर तामिळनाडू सरकारने त्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.
दिल्ली सरकारनेही तपासाचे आदेश दिले असून, त्यात हे रसायन आढळल्यास सरकार कठोर कारवाई करू शकते.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक