एका जोडप्याने आपलं बाळ विकल्याची धक्कादायक घटना समोर आली

बाळाला विकण्यामागील कारण तर त्यापेक्षाही हादरवून टाकणारं आहे

आयफोन खरेदी करता यावा म्हणून या जोडप्याने आपलं 8 महिन्यांचं बाळ विकलं

रील बनवण्यासाठी या जोडप्याला महागडा आयफोन खरेदी करायचा होता

ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील आहे

मुलाच्या आईला आधीच अटक करण्यात आली आहे

त्यानंतर मुलाचे वडील जयदेव यालाही अटक करण्यात आली

खारदह परिसरातील एका महिलेकडून बाळाची सुटका करण्यात आली

या जोडप्याने आपला मुलगा मोबाईल फोन घेण्यासाठी या महिलेला विकला होता

पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत