आता अंतराळ मोहिमेत होणार गायीच्या शेणाचा वापर!

अलीकडेच जपानच्या प्रयोगानं सर्वत्र खळबळ उडवून दिली. 

यामागचं कारण असं की, रॉकेटमध्ये इंधन म्हणून गायीच्या शेणाचा वापर केला गेला. 

या प्रयोगानं स्पेसच्या जगात एक वेगळीच क्रांती घडली.

आता आकाशात रॉकेट पाठवणं जास्त स्वस्त आणि सोपं होणार आहे. 

इंटरस्टेलर टेक्नॉलॉजी या जपानी कंपनीनं शेणापासून बायो मिथेन इंधन तयार केलं केलं आहे.

या इंधनाच्या माध्यमातून रॉकेट इंजिन सुरु करण्यात कंपनीला यश आलं आहे. 

टेस्टिंग वेळी रॉकेट इंजिनपासून 10-15 मीटर अंतरावर आग बाहेर निघताना दिसली. 

बायो-मिथेन इंधन बनवण्यासाठी गायीच्या शेणाचा वापर केल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. 

या इंधनामुळे अंतराळ मोहिमांमध्ये मोठा बदल होऊ शकतो, असा दावा केला जात आहे.