क्रिकेटमध्ये येणार नवीन नियम, बॉलिंग टीमसाठी ठरणार डोकेदुखी
विश्वचषक २०२३ संपताच आयसीसीने क्रिकेटचा नवा नियम आणला आहे.
क्रिकेटचा हा नवा नियम गोलंदाजी करणाऱ्या संघाला अडचणीत आणणार आहे.
आयसीसी सामन्यादरम्यान स्टॉप क्लॉक वापरणार आहे.
स्टॉप क्लॉक क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या वेळेवर लक्ष ठेवेल.
ओव्हरमधील वेळ कमी करण्याचा आयसीसीचा प्रयत्न आहे.
या नवीन नियमानुसार 2 ओव्हरमध्ये 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ गेल्यास दंड लावला जाणार आहे.
ही चूक एका डावात तीन वेळा पुनरावृत्ती केल्यास 5 धावांचा दंड देखील लागेल.
हा नियम पुरुष गटात एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये लागू असेल.
ही चाचणी डिसेंबर 2023 ते एप्रिल 2024 दरम्यान लागू केली जाईल.