Cricket Records: 'वन डे'मध्ये द्विशतकाची किमया साधणारे फलंदाज

भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक तीन एकदिवसीय द्विशतकांचा विक्रम आहे.

2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 264 धावा करून एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

त्यानंतर नंबर लागतो माजी स्टार फलंदाज वीरेंद्र सेहवागचा. त्याने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 219 धावा केल्या होत्या.

न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलची विश्वचषक 2015 मध्ये 237 धावांची खेळी रेकॉर्डब्रेक होती.

2015 मध्ये कॅनबेरा येथे झिम्बाब्वेविरुद्ध 215 धावा करून ख्रिस गेल या यादीत सामील झाला होता.

पाकिस्तानच्या फखर जमानने 2018 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 210 धावा केल्या होत्या.

श्रीलंकेचा पाथुम निसांका यानं याच वर्षी पल्लेकेले येथे अफगाणिस्तानविरुद्ध 210 धावांची खेळी केली.

इशान किशन 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध 210 धावांची खेळी करत या यादीत सामील झाला.

शुभमन गिलने 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 208 धावा ठोकून ही कामगिरी केली होती.

ग्लेन मॅक्सवेल वनडेत द्विशतक करणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. त्याने 2023 च्या ICC विश्वचषक स्पर्धेत द्विशतक लगावले.

अफगाणिस्तानविरुद्ध वानखेडेवर मॅक्सवेल 201 धावांवर नाबाद राहिला.

या यादीतील महत्त्वाचं नाव म्हणजे सचिन तेंडुलकर. मास्टर-ब्लास्टरने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 200 धावा केल्या होत्या.