'रोहितने माझी माफी मागितली',  संजू सॅमसनचा मोठा खुलासा!

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये रोहित शर्मा एक मास्टरस्ट्रोक खेळणार होता, यावर संजू सॅमसनने खुलासा केलाय.

वर्ल्ड कप फायनलमध्ये संजूला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचं निश्चित झालं होतं. परंतू त्याचं नाव यादीतून काढण्यात आलं.

टॉसच्या आधी काही मिनिटाआधी माझं नाव काढलं गेलं अन् रोहितने माझी माफी देखील मागितली, असं संजू म्हणाला.

रोहितने मला 10 मिनिटं बाजूला घेतलं अन् मला असा निर्णय का घेतला? यावर मला समजवू लागला.

मला रोहितच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप खेळायला मिळाला नाही, याचं मला नक्की दु:ख राहिल, असंही संजू म्हणालाय.

मला संधी मिळाली याच्या दु:खापेक्षा आम्हाला वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद जास्त होता, असंही संजू म्हणतो.

दरम्यान, रोहित शर्मा एक अनोखा कॅप्टन आहे. सर्व खेळाडूंना त्याच्या कॅप्टन्सीखाली खेळायला आवडतं, असंही संजू म्हणाला.