भारतात जन्मलेला 'हा' क्रिकेटर दुसऱ्या देशाकडून खेळणार वर्ल्ड कप

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय वंशाचे अनेक क्रिकेटपटू खेळणार आहेत.

यामध्ये नेदरलँडचा अष्टपैलू खेळाडू तेजा निदामनारू ही खेळणार आहे.

तेजाचा जन्म 1994 मध्ये आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे झाला.

नेदरलँडमध्ये सेटल होण्यापूर्वी तो न्यूझीलंडमध्ये अनेक वर्षे राहिला.

त्याने 2018 मध्ये ऑकलंडसाठी लिस्ट-अ मध्ये पदार्पण केले.

त्यानंतर गेल्या वर्षी तो नेदरलँडकडून खेळण्यासाठी सिलेक्ट झाला

वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे पदार्पणातच त्याने अर्धशतक पटकावलं होतं

WC क्वालिफायरमध्ये नेदरलँड्ससाठी सर्वात वेगवान शतक ठोकले.

त्याने आतापर्यं वनडेमध्ये २ शतके आणि २ अर्धशतके झळकावली आहेत.