देवानंदच्या फेव्हरेट हिरोईनला मिळालं त्यांच्या बर्थडे दिवशी रिटर्न गिफ्ट

अभिनेते देवानंद यांची 26 सप्टेंबर 2023 रोजी 100वी जयंती साजरी झाली.

देवानंद आज हयात असते तर त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा करत असते. 

त्यांच्या बर्थडे दिवशी त्यांच्या लाडक्या अभिनेत्रीला खास रिटर्न गिफ्ट मिळालं आहे. 

देवानंद यांची आवडती अभिनेत्री म्हणजे वहीदा रहमान. 

वहीदा रहमान आणि देवानंद यांनी एकत्र अनेक सिनेमात काम केलं. 

त्याकाळी दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर चांगलीच गाजली होती. 

वहीदा रहमान यांना 53वा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे. 

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे.