दर्श मौनी अमावस्या 9 की 10 फ्रेब्रुवारीला? पहा तिथी, वेळ

सनातन हिंदू धर्मात मौनी अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते.

पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला दर्श मौनी अमावस्या म्हणतात.

धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी मनुष्याने मौन बाळगावे.

पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे किंवा घरी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे.

यंदाची दर्श मौनी अमावस्या 09 फेब्रुवारीला आली आहे.

धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी मुनि ऋषिंचा जन्म झाला होता.

त्यामुळे मौनी या शब्दाची उत्पत्ती मुनी या शब्दापासून झाली, असे मानले जाते.

कृष्ण पक्षातील 15वा दिवस अमावस्या म्हणून ओळखला जातो.

मौनी अमावस्येच्या दिवशी प्रामुख्याने पितरांसाठी स्नान-दान करावे.