नवऱ्यापेक्षा दुप्पट संपत्तीची मालकीण आहे ही अभिनेत्री!

बॉलिवूडमध्ये आज अशी एक अभिनेत्री आहे जी कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे.

अभिनेत्रीने गेल्या 17 वर्षांत केलेल्या कामातून कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे.

ही अभिनेत्री आहे सुपरस्टार दीपिका पदुकोण.

2006 मध्ये 'ऐश्वर्या' या कन्नड चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

मात्र, दीपिकाला 'ओम शांती ओम'मधून लोकप्रियता मिळाली.

दीपिका आता बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्टार्सपैकी एक आहे.

एका चित्रपटासाठी दीपिका 15  ते 16 कोटी रुपये मानधन घेते.

दीपिका तिचा पती रणवीर सिंगपेक्षा दुप्पट संपत्तीची मालकीण आहे.

दीपिकाची संपत्ती 497 कोटी रुपये आहे तर रणवीरची संपत्ती केवळ 245 कोटी रुपये आहे.