धनु राशीला सप्टेंबर महिना कसा असेल?

ऑगस्ट महिना संपून आता सप्टेंबर महिना सुरू होत आहे.

ज्योतिषाचार्य डॉ. राजेश सामानगावकर यांनी धनु राशीच्या मंडळींना सप्टेंबर कसा राहणार याबाबत माहिती दिली आहे.

धनु राशीला सप्टेंबर महिना संमिश्र फळ देणारा आहे.

धनु राशींच्या लोकांनी 1, 2 आणि 3 सप्टेंबर पर्यंत तब्येतीची काळजी घ्यायची आहे.

या काळात पोटाचे विकार उद्भवण्याची शक्यता जास्त आहे. या काळात अपेंडिक्स सारखे ऑपरेशन देखील होऊ शकतात.

गुरू हा वक्री होणार आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात चांगली प्रगती पाहायला मिळेल.

धन स्थानाच्या द्वितीय स्थानात शनी असल्याने अतिशय धनाढ्य योग आहे.

कोणाकडे पैसे बाकी असतील तर ते परत मिळण्याचे संकेत मिळत आहेत, असे सामानगावकर यांनी सांगितले.

नोकरीच्या क्षेत्रात देखील आपल्याला प्रमोशन होण्याची चांगली संधी या महिन्यात येणार आहे.

 या महिन्यात परदेशात जाण्याचा योग येणार असल्याचे डॉ. राजेश सामनगावकर यांनी सांगितले.