चुक्याच्या शेतीतून गाव मालामाल!

शेती करताना शेतकरी नवनवीन प्रकारच्या पिक पद्धतीचा अवलंब सध्याचा घडीला करत आहेत.

धाराशिव जिल्ह्यात एक असं गाव आहे ज्या गावात पालेभाजी प्रकारातील चुका या पालेभाजीचे उत्पादन घेतले जाते.

विशेष म्हणजे पालेभाजीसाठी नाही तर बियाण्यांच्या विक्रीसाठी उत्पादन घेतले जाते. या शेतीतून शेतकऱ्यांना लाखोंची कमाई होत आहे.

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द या गावात चुक्याची शेती केली जाते.

पिंपळा खुर्द या गावातील 90 टक्के शेतकरी खरीप हंगामात पावसाळी कांद्याचे उत्पादन घेतात.

पावसाळी कांद्यानंतर ते कांद्याच्या शेतात चुका या पिकाची लागवड करतात.

चुक्याचे बी तयार झाले की हैदराबाद येथे विक्री केली जाते. हैदराबाद येथे बियाण्यांना मोठी मागणी आहे.

चुक्याला 50 ते 60 रुपयांपासून शंभर ते दीडशे रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळतो.

चुका लागवडीतून एकरी 50 ते 60 हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंतचे उत्पादन होत असल्याचे शेतकरी बालाजी पाटील यांनी सांगितले.

अंजीर शेतीतून तरुण शेतकरी लखपती!