वृक्ष लागवड आणि संगोपन ही आता काळाजी गरज बनलीय. काही निसर्गप्रेमी आपलं आख्खं आयुष्य निसर्गासाठी वाहून घेतात.
धाराशिव जिल्ह्यातील एका निसर्ग प्रेमीने तीनशे एकर उजाड आणि ओसाड असलेला परिसर वनराईने नटवलाय.
1 लाख 5 हजार वृक्षांची लागवड करून नंदनवन फुलवलेय.
तर ध्यान केंद्राच्या माध्यमातून ध्यान साधना आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा ही समावेश त्यांनी याठिकाणी केलाय.
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील हाडोंग्री येथील बाळासाहेब पाटील यांनी धाराशिव इको व्हिलेज तयार केलंय.
वडीलोपार्जित तीनशे एकर उजाड आणि ओसाड माळरानावर त्यांनी वृक्षांची लागवड केली आहे.
त्यामध्ये फळांची फुलांची आणि औषधी वनस्पतींची लागवड केलीय.