मराठमोळ्या स्नेहानं सिंगापूर गाजवलं

मराठमोळ्या स्नेहानं सिंगापूर गाजवलं

सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत धाराशिवची कन्या स्नेहा दुधाळ हिनं मोठं यश मिळवलंय. 

नुकतेच सिंगापूर येथे आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धा पार पडली. यात 13 देशांनी सहभाग नोंदवला होता. 

भूम तालुक्यातील पाथरूड येथील स्नेहा दुधाळ हिनं मराठमोळी लावणी सादर करत द्वितीय क्रमांक पटकावला. 

अनेक संकटांवर मात करत तिनं जागतिक पातळीवर आपल्या नृत्य कौशल्याचा ठसा उमटवला. 

स्नेहाचे शिक्षक वडील महादेव दुधाळ यांचं कोरोना काळात निधन झालं.

घरची परिस्थिती बेताची असल्यानं स्नेहा मोबाईलवर पाहून घरीच डान्स शिकते.

गावकरी आणि नातेवाईकांच्या मदतीने ती सिंगापूर येथील स्पर्धेत सहभागी झाली आणि यश मिळवलं. 

स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सरकारने तिला आर्थिक मदत करावी, असं आवाहन ग्रामस्थ करतायेत. 

बॉडी बिल्डर होण्याची त्रिसूत्री