मराठवाड्यात शेती मोठ्या प्रमाणात कोरडवाहू आहे. शेती कोरडवाहू असल्याने बहुतांश शेतकरी पारंपरिक सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कापूस आणि तुरीचे पीक घेतात.
धाराशिव जिल्ह्यात काही वर्षांपासून सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
मात्र, बऱ्याचवेळा सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून धाराशिवमधील शेतकरी संभाजी सलगर यांनी सोयाबीनवर प्रक्रिया उद्योग सुरु केला आहे.
सोयाबीनपासून ते दूध आणि पनीर निर्मिती करत असून शेतकऱ्यांना नवीन मार्ग दाखवण्याचं काम त्यांनी केलं आहे.
यासाठी त्यांना 12 लाखापर्यंत खर्च आला आहे. एक किलो सोयबीनपासून सहा ते सात लीटर दूध निघते आणि त्या दुधापासून दिड किलो पनीर काढता येते.
सोयाबीनपासून बनवलेले दूध 30 रुपये लिटर दराने तर पनीर 160 रूपये किलोने विकतात.
सर्व खर्च वजा करून महिना काठी त्यांना 40 हजार रुपये रुपये नफा राहतो. हा जिल्ह्यातील एकमेव प्रयोग आहे, असं संभाजी सलगर यांनी सांगितलं.