शेतकऱ्यानं उभ्या पपईवर फिरवला रोटावेटर

शेतकऱ्यानं उभ्या पपईवर फिरवला रोटावेटर

शेती हा बेभरवशाचा व्यवसाय असून शेतकऱ्यांना नेहमची संकटांचा सामना करावा लागतो. 

बऱ्याचदा शेकऱ्याचा माल बाजारात आला की दर कोसळतात आणि घातलेला खर्चही निघत नाही. 

अशीच काहीशी घटना धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात घडली असून शेतकऱ्याचं नुकसान झालंय. 

वारे वडगाव येथील शेतकरी देवेंद्र डिसले यांनी सव्वा एकर पपईच्या बागेवर रोटावेटर फिरवलाय. 

लाखो रुपये खर्चून बाग जोपासली पण ऐन भरात असताना पपईचे बाजारभाव कोसळले.

25 रुपये किलो विक्री होणारी पपई एक ते दोन रुपये किलो दराने विक्री होऊ लागली. 

एका झाडाला 70 किलोपर्यंत माल असूनही व्यापारी घेण्यात तयार नव्हते.

पपई बाजारात घेऊन गेले तरी वाहतूक कर्च निघाला नाही त्यामुळे बागेवर रोटावेटर फिरवला.